ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

स्व. शिवाजी पुंडलिकराव गुरुडे यांच्या स्मरणार्थ सोमवारी शोकसभा

स्व. शिवाजी पुंडलिकराव गुरुडे यांच्या स्मरणार्थ सोमवारी शोकसभा


उदगीर : स्व. शिवाजी पुंडलिकराव गुरुडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार, ता.६  रोजी सकाळी ११.०० वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही शोकसभा उदयगिरी औद्योगिक वसाहत, लोणी (ता. उदगीर) येथे होणार असून, नागरिकांनी व स्व. गुरुडे यांचे स्नेही, हितचिंतक आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,  यलम समाज व मित्र परिवार, उदगीर, रंगराव पाटील खाजगी बाजार, नळेगाव रोड, उदगीर, संघर्ष मित्र मंडळ, उदगीर तसेच दाल मिल असोसिएशन, उदगीर यांच्या 
तर्फे आयोजन करण्यात आले आहे.
शोकसभेत स्व. शिवाजी पुंडलिकराव गुरुडे यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post