GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर येथे ५९९ श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव मंजूर

उदगीर येथे ५९९ श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव मंजूर

तहसीलदार रामेश्वर गोरे यांची माहिती 


उदगीर : येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिकांनी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल केले होते. त्यापैकी श्रावणबाळ योजनेचे ४६८ तर संजय गांधी निराधार योजनेचे ९१ असे एकुण ५९९ प्रस्तावांना मंजूरी दिली असल्याची माहिती उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली.
उदगीर मतदार संघाचे आमदार तथा
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या सुचनेने दि.३० डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजना ( अपंग, विधवा, परितक्तया, अंतर्भुत पीडित आजारी इ.) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगनिवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेच्या पात्र लाभार्थांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे या लाभार्थांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या बैठकीस तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, अव्वल कारकून फुटाणे डी.आर., संगायोचे महसूल सहाय्यक पाटील आर.जी., आॅपरेटर समाधान कांबळे आदी उपस्थित होते.



 

Post a Comment

1 Comments

  1. Lucky Club Live Casino - Online Casino
    Lucky Club Casino. One of the best luckyclub.live online casinos to play with your friends. With over 2000 games from the best providers, you are sure to have some fun

    ReplyDelete