ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीरचे सामान्य रुग्णालय ३०० बेडचे करावे : माजी मंत्री आ.संजय बनसोडे


*उदगीरचे सामान्य रुग्णालय ३०० बेडचे करावे*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांची मागणी*


*उदगीर* : उदगीर शहर हे एक लाख लोकसंख्येचे कर्नाटक सिमेवरील महत्वाचे शहर आहे. उदगीर हे कर्नाटकातील बिदर तसेच लातूर या दरम्यान आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण असुन सध्या उदगीर येथे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय आहे. जिल्हयातील दोन तालुक्यातून मोठया प्रमाणात रुग्ण उदगीर येथे सेवा घेण्यासाठी येत असल्यामुळे सध्याची व्यवस्था अपूरी पडत आहे. दिवसेंदिवस शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या तसेच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या लक्षात घेता उदगीर येथील सामान्य रुग्णालयाची क्षमता ३०० बेडपर्यंत वाढविण्यात यावी, अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देवुन याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना आरोग्य विभागाच्या सचिवांना त्यांनी दिल्या आहेत.

उदगीर व जळकोट मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, सध्याच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत उपलब्ध खाटांची संख्या अपुरी पडत असून अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयाची बेड क्षमता ३०० पर्यंत वाढवून अत्याधुनिक सोई - सुविधेसह नविन इमारतीत अधिक सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यापूर्वीही आ. संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे उदगीरमध्ये विविध महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये ट्रामा केअर सेंटर, स्वतंत्र ओपीडी इमारत, आधुनिक ऑक्सिजन प्लांट, २०० खाटांचे रुग्णालय, तसेच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. या सर्व सुविधांमुळे परिसरातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून उपचार प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे ही काळाची गरज आहे म्हणून मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आ.संजय बनसोडे यांनी वाढवणा बु. येथे ग्रामीण रुग्णालय उभारले त्याचबरोबर मंगरुळ व घोणसी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारुन ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
उदगीर येथील सामान्य रुग्णालयाची क्षमता वाढल्यास अधिक डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होतील, तसेच गंभीर रुग्णांवरील उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील, असे आ.संजय बनसोडे यांनी बोलताना सांगितले.
उदगीरच्या आरोग्य सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी आज केली आहे.
सामान्य रुग्णालय ३०० बेडचे झाल्यास उदगीर व परिसरातील लाखो नागरिकांना त्याचा थेट लाभ होणार असून आरोग्य सेवेचा दर्जाही मोठ्या प्रमाणात उंचावणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी बोलताना सांगितले.

***************

Post a Comment

Previous Post Next Post