लातूर : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


Post a Comment