GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

प्रा. सुनील राठोड यांना पीएचडी पदवी प्रदान

प्रा .सुनील  राठोड यांना पीएचडी पदवी प्रदान
उदगीर -    उद्देशवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव ता. देवणी येथील प्राध्यापक सुनील काशीराम राठोड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत राज्यशास्त्र या विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
        प्रा. डॉ.व्ही. डी. गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली "मनरेगाच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायतची भूमिका "या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठात सादर करण्यात आला. बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा.डॉ.महेश मोटे सर हे उपस्थित होते. यांच्यामार्फत विद्यापीठाच्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली .उद्देशवर शिक्षण संस्थेचे सचिव काशिनाथराव बिरादार, उपाध्यक्ष पांडुरंग काशिनाथराव बिरादार, प्राचार्य प्रा.नवनाथ खुळे सर सर्व प्राध्यापक वर्ग व मोघा येथील विद्यालयातील  मुख्याध्यापक बालुरे सर, सहशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहून अभिनंदन केले आहे .
  
 तसेच प्राचार्य डॉ.एच. बी. राठोड श्री. किशनराव चव्हाण, श्री. बाळासाहेब राठोड,डॉ. शिवाजी राठोड, श्री. काशीराम राठोड, प्रा. डॉ.फड, प्रा. डॉ.अजय गव्हाणे, प्रा. डॉ.कोनाळे, प्रा. डॉ. मानवते, प्रा. डॉ.आनंद शिंदे, प्रा. सुरेश देऊसटे, प्रा. बालाजी बिरादार,प्राचार्य सतीश चव्हाण व मित्रपरिवार आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिले.

Post a Comment

0 Comments