GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मतदार संघातील पाणीपुरवठ्याचे कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करा : माजी पाणीपुरवठा मंत्री आ.संजय बनसोडे

मतदार संघातील पाणीपुरवठ्याचे कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करा : माजी पाणीपुरवठा मंत्री आ.संजय बनसोडे 

लातूर : मतदार संघातील बहुतांश भाग हा डोंगरी भाग असुन अनेक गावामध्ये आजही पाणीटंचाई असल्या कारणाने प्रत्येक वेळी उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना घागर भर पाण्यासाठी वन - वन भटकावे लागते. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शासनाच्या विविध 148 योजनेमधून प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये उदगीर - जळकोट मतदारसंघातील 140 गावांसाठी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली आहे. सदर पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा व संबंधीत पाणीपुरवठ्याचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना काल माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

ते लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजीत पाणीपुरवठ्यासंबंधी आयोजीत बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना देत होते.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगरसेवक शमशोद्दीन जरगर, मादलापुरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी पाणीपुरवठा मंत्री आ.संजय बनसोडे यांनी, जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत व वाटरग्रीड योजनेच्या माध्यमातून उदगीर - जळकोट मतदार संघातील १४० गावांसाठी १४८ योजनेच्या माध्यमातून जवळपास ७७० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मतदार संघातील लहान - मोठ्या गावासह वाडी तांड्यावर देखील आता पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घेवुन सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे. संबंधित काम हे ठेकेदाराकडुन दर्जेदार व दिलेल्या कालावधीत पुर्ण करुन घेण्याच्या सुचना देवून प्रत्येक गाव निहाय आढावा घेतला.
या पाणी पुरवठा योजनेची तांत्रीक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असुन १४० योजनेच्या माध्यमातून मार्च - २०२४ अखेर मतदार संघातील सर्व कामे पूर्ण होणार असून तात्काळ काम सुरू करण्याच्या सुचना आ.बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी ग्रामीण विभाग जिल्हा परिषद लातूरचे कार्यकारी अभियंता शेलार बी.आर.,उदगीर - जळकोटचे उप अभियंता गर्जे एस.पी.,  महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचेकार्यकारी अभियंता कायंदे एस. व्ही. यांच्यासह सर्व तालुका स्तरीय अभियंत्यांची गाव निहाय आढावा बैठक घेण्यात आली.

Post a Comment

0 Comments