GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मतदार संघातील रस्ते ,रेल्वे व आरोग्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार - राज्यमंत्री संजय बनसोडे जनतेच्या सेवेसाठी आणखी १० रुग्णवाहिका आणणार...

मतदार संघातील रस्ते ,रेल्वे व आरोग्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार - राज्यमंत्री संजय बनसोडे        

जनतेच्या सेवेसाठी आणखी १० रुग्णवाहिका आणणार...
            

उदगीर : उदगीर जळकोट मतदार संघातील रस्ते , रेल्वे व आरोग्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचे  प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.  
ते मराठवाडा जनता विकास परिषद व लाॅयन्स क्लब उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवाद विकासासाठी' या कार्यक्रमाचे आयोजन उदगीर येथे करण्यात आले होते.
या संवाद बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, डॉ.
रामप्रसाद लखोटिया, डॉ. दत्ता पाटील, प्रा. डॉ. प्रकाश देशपांडे, रमेश अंबरखाने, मोतीलाल डोईजोडे,  उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी,  तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॕनियन जाँन बेन, पो.नि. दिपककुमार वाघमारे, पो.नि. गोरख दिवे आदी उपस्थित होते.  
यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, उदगीर जळकोट मतदार संघाचा विकास वेगाने होत आहे. जलसिंचन, रस्ते ,वाहतूक वीज, आरोग्य, या विभागाच्या विकासासाठी मागील वर्षात आपण भरीव अर्थिक तरतूद केली आहे.  प्रशासकीय इमारत तहसील इमारत, तसेच पोलीस वसाहतीचे, पोलीस स्टेशनचे बांधकामासाठी लवकरच काम सुरू होणार आहे.   
उदगीरच्या विकासासाठी अशा संवादाची गरज आहे प्रशासनातील निवृत्त अधिकारी विविध विषयातील तज्ञ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा फायदा करून देण्यासाठी अशा संवाद कार्यक्रमात सहभागी व्हावे, तसेच उदगीरच्या विकासासाठी शहरातील प्राध्यापक, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, यांनी अशा  बैठकीचे आयोजन करावे,  प्रत्येक आठवड्यात अशा बैठका घेण्यात याव्यात शहरातील तज्ञ नागरिकांनी प्रशासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे,  त्यामुळे उदगीर परिसराचा विकास अधिक वेगाने  करता येईल असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments