ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन

लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन


उदगीर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले.

व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे उपमुख्याध्यापक वसंत वाघमारे पर्यवेक्षक  कृष्णा मारावार किरण नेमट माधव मठवाले तानाजी खोकले प्रमुख वक्ते बालाजी पडलवार अंबिका पारसेवार अभ्यासपूरक मंडळ प्रमुख लक्ष्मी चव्हाण सहप्रमुख निलेश मांडवकर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते बालाजी पडलवार यांनी ‘वंदे मातरम्’च्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. ‘या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जनसामान्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे आणि स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे सांगितले तर अंबिका पारसेवार यांनी वंदेमातरम या गीताचा अर्थ सांगून गीताचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  कार्यक्रमप्रमुख अंबिका पारसेवार  व करुणा गायकवाड यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post