यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबादमध्ये पोट, लिव्हर व पचनसंस्थेच्या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वरे उपचार सुविधा
डॉ. प्रसन्न गोरे यांची पञकार परिषद
उदगीर : पोट, अन्ननलिका, लहान-मोठे आतडे, यकृत (लिव्हर), स्वादुपिंड (पॅनक्रियाज), पित्ताशय व पित्तनलिकांच्या आजारांवर जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथे उपलब्ध असल्याची माहिती हॉस्पिटल येथील प्रसिद्ध पोट विकार तज्ञ डॉ.प्रसन्न गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अॅडव्हान्स्ड एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, Endoscopic Ultrasound (EUS), FibroScan, High Resolution Manometry, pH Monitoring, Capsule Endoscopy तसेच विविध Therapeutic Endoscopy सुविधा उपलब्ध आहेत. तसेच POEM, G-POEM, EMR, ESD, SpyGlass Cholangioscopy यांसारख्या प्रगत उपचारपद्धतीद्वारे अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार केले जातात.
अॅसिडिटी, अल्सर, पोटदुखी, गॅस, IBS, IBD, फॅटी लिव्हर, हेपाटायटिस B व C, लिव्हर सिरोसिस, पॅनक्रियाटायटिस, पित्ताशयातील खडे, पचनसंस्थेतील रक्तस्राव तसेच पोट, आतडे, लिव्हर आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान व उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच लिव्हर ट्रान्सप्लांट सुद्धा यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे पूर्ण होते. याशिवाय रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध असल्याचे डाॅ. गोरे यांनी सांगीतले
यावेळी आत्याधुनिक एंडोस्कोपी सूट, समर्पित गॅस्ट्रो आयसीयू, २४ तास आपत्कालीन सेवा, अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रो सर्जन आणि मल्टिडिसिप्लिनरी तज्ज्ञांची टीम रुग्णांना सेवा देत आहे. आवश्यकतेनुसार लिव्हर ट्रान्सप्लांट व प्रगत गॅस्ट्रो सर्जरीची सुविधाही उपलब्ध असून, अचूक निदान व आधुनिक उपचारांमुळे राज्यासह देशभरातील रुग्णांचा यशोदा हॉस्पिटलवर वाढता विश्वास असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.
डॉ. प्रसन्न गोरे यांनी मुंबईतील प्रतिष्ठित टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल येथून एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून त्यांनी एम.डी. (मेडिसिन) ही पदवी संपादन केली. मुंबईतील जागतिक दर्जाच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मधून डी.एन.बी (मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी) ही सुपरस्पेशालिटी पदवी प्राप्त केली. सध्या ते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे.
यशोदा हॉस्पिटल येथे अधिक माहितीसाठी संपर्क :
किरण अप्पाराव बडे
मो.9154167997


Post a Comment