GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर व सेवा दंत रुग्णालय उदगीर यांच्या वतीने मोफत दंत रोग तपासणी


जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर व सेवा दंत रुग्णालय उदगीर यांच्या वतीने मोफत दंत रोग तपासणी

डाॅ.गोविंद सोनकांबळे यांचा स्तुत्य उपक्रम

उदगीर : येथील प्रसिद्ध दंतरोग चिकित्सक डाॅ.गोविंद सोनकांबळे यांच्या सेवा दंत रुग्णालयाला २५ वर्ष पुर्ण होत असल्याने त्यांच्या व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचा नुकताच पहिला दिवस पार पडला या शिबिराचे उद्घाटन सामान्य रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. दत्ता पवार, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, निमाचे अध्यक्ष डॉ. घोनसीकर होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कोठारे ,महिला फोरमचे अध्यक्षा डॉ. ज्योती मध्वरे, डॉ.संजय कुलकर्णी, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. शैलेश येरोळकर, डॉ. श्रीकांत मध्वरे, डॉ. सुनील बनशेळकीकर, डॉ. प्राजक्ता गुरुडे, डॉ.प्रदीप जटाळे, डॉ.धनाजी कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
       या शिबिराचे महत्त्व समजून उदगीर शहर व परिसरातील गरजू रुग्णांनी गर्दी केली होती. या शिबिरात मुख्यत्वे दात काढणे, एक्स-रे काढणे, दातामध्ये सिमेंट भरणे वदातामध्ये पक्के फिलींग करणे इत्यादी उपचार मोफत केले गेले.
     या या शिबिरात रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय लातूर यांच्या वतीने डॉ.अरुण बालकुंदे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ.अश्विन  कोडगी, डॉ. भाग्योदय सर्वात सेवा दंत रूग्णालयाच्या वतीने 
डॉ. गोविंद सोनकांबळे व डॉ. शुभांगी सानप  उपस्थित होते.
या शिबिरासाठी अविनाश भरावत, केदार उपरबावडे, शाहूराज बिरादार, जनाबाई श्रीरामे, विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीनी परिश्रम घेतले.
सेवा दंत रूग्णालयाच्या वतीने सर्व मान्यवर डॉक्टर मंडळींचा सत्कार सौ.उषा कांबळे (सोनकांबळे) तसेच डॉ. गोविंद सोनकांबळे यांनी केला. या शिबीराचा लाभ अनेक गरजू रुग्णांनी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments