ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

अहमदपूर ते उदगीर रस्त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर; माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश

अहमदपूर ते उदगीर रस्त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर; माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश

अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला प्रश्न आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने मार्गी


उदगीर : अहमदपूर ते उदगीर या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी शासनाने तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदपूर-उदगीर हा रस्ता मराठवाड्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक, मालवाहतूक तसेच शेतमालाची ने-आण होत असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा अपघातांच्या घटनाही घडत असल्याने या रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणाची मागणी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर आ. संजय बनसोडे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन तसेच राज्य शासनाकडे वारंवार निवेदने सादर करून या प्रश्नाची गंभीरता मांडली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असुन पुर्णा - पालम- राणीसावरगाव-काळेगाव - अहमदपुर - शिरुर ताजबंद - हाळी - उदगीर या राज्यमार्गे २४९ साठी अखेर ३०० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली.
याबाबत बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, “अहमदपूर ते उदगीर रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या मार्गाची अवस्था अतिशय खराब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. जनतेची ही मागणी शासनापर्यंत पोहोचवून निधी मंजूर करण्यात यश आले असून लवकरच कामाला सुरुवात होईल.”
या निधीतून रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण तसेच आवश्यक पूल व सुरक्षा सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार असून परिसरातील आर्थिक व सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी आ. संजय बनसोडे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने अहमदपूर-उदगीर परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सदर रस्त्यासाठी निधी मंजुर केल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
अहमदपूर ते उदगीर रस्त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने आ.संजय बनसोडे यांचे मतदार संघातील जनतेने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
************

Post a Comment

Previous Post Next Post