उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची मागणी
उदगीर : तीन राज्याच्या सीमेवर असलेले उदगीर शहर हे एक ऐतिहासिक शहर असून येथील बाजारपेठ मोठी असल्याने व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. उदगीर शहरालगत दोन-तीन तालुके असून दिवसेंदिवस महसूल विभागाची कामे वाढत आहेत व यासाठी उदगीर ते लातूर हे जवळपास 70 किलोमीटरचे अंतर पार करून लातूरला जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
याकरिता उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापण करावे अशी मागणी
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे.
उदगीर शहरात मागील काळात विविध शासकीय इमारती बांधून तयार केल्या आहेत.
सद्या जिल्हास्तरीय न्यायालय, आर. टी. ओ. कार्यालय वेगवेगळ्या प्रकारची अनेक जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असल्याने येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन मतदारसंघातील जनतेचा वेळ व पैसा वाचेल व अधिक जलदगतीने कामे होण्यास मदत होईल म्हणून सदर कार्यालय लवकरात लवकर उदगीरला करावे. अशी लेखी मागणी आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे. त्यांच्या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
*******************
0 Comments