पत्रकारांच्या मागणीसाठी मनसेने केले रस्तारोको आंदोलन
मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांचा पुढाकार
उदगीर : गेल्या 56 दिवसापासून उदगीर शहरातील नांदेड बिदर रोडवरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे मागणीसाठी मराठी पत्रकार संघ व पत्रकारांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु असुन मागणीच्या पूर्ततेसाठी पञकारांनी राज्यपाल, आयुक्त, जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदने देऊन वारंवार विनंती करून सुद्धा आंदोलनाच्या ५६ दिवसानंतर ही उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पञकारांनी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठींबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उदगीरच्या छञपती शिवाजी महाराज चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असुन लवकरात लवकर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी या रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली आहे . मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढावे अन्यथा मनसेच्या वतीने पुन्हा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही या रास्ता रोको आंदोलना दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रशासनास दिला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे,शहराध्यक्ष अभय सुर्यवंशी, शहरसचिव अमोल गाजरे,शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे,तालुका उपाध्यक्ष संतोष केंद्रे,गुरूदत्त घोणसे, गंगाधर पिटाळे,सतिश चव्हाण,लखन पुरी,दयानंद डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष विजय देबडवार,शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील, शेतकरी तालुकाध्यक्ष बाबुराव जाधव,रोजगार तालुकाध्यक्ष राम कांबळे,विद्यार्थी शहराध्यक्ष दिनेश पवार आदी पदाधिकारी सह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
0 Comments