GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

अश्विन हणमंते यांची एमपीएससीतून अधिकारीपदी निवड; रंगकर्मीच्या वतीने सत्कार

अश्विन हणमंते यांची एमपीएससीतून अधिकारीपदी निवड;  रंगकर्मीच्या वतीने सत्कार 

अश्विनने मिळवले एका वर्षात झाली चार पदावर निवड

उदगीर : अश्विन दिलीप हणमंते यांची   महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत  घेण्यात  आलेल्या सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी) पदी निवड झाल्याने रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार  करण्यात आला.
यावेळी दिलीप  हणमंते, रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, रसूल दा पठाण , रामदास केदार, सिद्धार्थ सूर्यवंशी, रामदास बेंबडे, प्रल्हाद  येवरीकर ,  नागनाथ गुट्टे ,दत्ताञी सुर्यवंशी , उदयकुमार दिलीप हणमंते , बाबासाहेब मादळे आदींच्या उपस्थितीमध्ये अश्विन हणमंते यांचा सत्कार करण्यात आला .

स्पर्धा परीक्षेचा कुठलाही वारसा नसलेले अश्विन हणमंते यांचे वडील विद्यावर्धिनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत तर आई गृहिणी आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीर येथील विद्या वर्धनी हायस्कूल येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे झाले त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली.   अतिशय  कष्ट व जिद्द व, प्रयत्नांची पराकाष्टा करून, अविरतपणे अभ्यास करून आपले हे ध्येय साध्य केले आहे. या संघर्षाच्या काळामध्ये  कोरोना सारखी महामारी भारतामध्ये आलेली असताना आपल्या अभ्यासावर त्यांनी परिणाम न होऊ देता आपले सातत्य राखून हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

अश्विनचे वर्षभरात  चार परीक्षेत यश पदेही मिळवले

अश्विन दिलीप हनमंते यांनी 2020 च्या मध्ये एमपीएससीच्या पूर्व परीक्षेतच अपेक्षा आल्यानंतरही 2021 मुख्य परीक्षा पाच  गुणांनी  निकाल हुकला. परंतु 2022 या एकाच वर्षात कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कनिष्ठ अभियंता केंद्रीय जल आयोग,  भूमी अभिलेख विभाग,तलाठी अशा पदावर निवड   होवूनही राजपत्रित अधिकाऱ्याचे ध्येय असल्याने 2022 मध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी या परीक्षेत सहाय्यक अभियंता पद मिळवत राजपत्रित अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केले.

Post a Comment

0 Comments