GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर-जळकोट मतदार संघात नैसर्गिक अतिवृष्टीमुळे झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी

उदगीर-जळकोट मतदार संघात नैसर्गिक अतिवृष्टीमुळे झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची लेखी निवेदनाव्दारे मागणी

उदगीर : जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे रहावे व उदगीर-जळकोट तालुक्यातील सन २०२५ मध्ये झालेल्या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरीकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एका निवेदनाव्दारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री तथा उदगीर - जळकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे. या बाबत आपण लवकरच मदत करु असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.संजय बनसोडे यांना दिले आहे.
या निवेदनात आ.संजय बनसोडे यांनी,  मतदार संघातील उदगीर-जळकोट तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्ती, जनावरे, पडझड झालेली घरे, गोठे, सार्वजनिक/खाजगी मालमत्ता, तात्पुरत्या स्वरुपात निराधार झालेल्या व्यक्ती, शेतीपीक नुकसान, जमीन खरडून गलेले या सर्वांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे उदगीर व जळकोट तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ०५ व्यक्ती मृत पावले आहेत. मृत पावलेल्या व्यक्तीना अद्यापपर्यंत कसलीही मदत देण्यात आलेली नाही.
उदगीर तालुक्यातील मृत जानावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये मोठी दुधाळ जनावरे व लहान दुधाळ जनावरे यांचाही समावेश आहे. अद्यापपर्यंत या मृत पावलेल्या जनावरांना कसलीही मदत देण्यात आलेली नाही.
 उदगीर तालुक्यात अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांची एकूण संख्याही मोठी असून, अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या अडीचशेच्या जवळपास आहे व बाधित गोठयांचाही समावेश आहे. तसेच जळकोट तालुक्यातील अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची लक्षणीय आहे.
 उदगीर तालुक्यात सार्वजनिक खाजगी मालमत्तेचे नुकसान होवून त्यामध्ये अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची व पुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अतिवृष्टीमुळे तात्पुरत्या स्वरुपात निराधार झालेल्या उदगीर तालुक्यातील शंभरच्या जवळपास कुंटुंबे आहेत व ४९७ बाधित व्यक्ती आहेत. शेतीपिकाचे नुकसान उदगीर तालुक्यातील बाधित गावांची संख्या ९७ आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या साठ हजाराच्या जवळपास आहे. त्यामध्ये जिरायत आणि बागायत शेतकरी आहेत तर जळकोट तालुक्यातील बाधित गावांची संख्या ४७ व बाधित शेतकऱ्यांची संख्या एकवीस हजाराच्या जवळपास आहे. त्यामध्ये जिरायत व बागायतदार शेतकरी आहेत.
 उदगीर तालुक्यातील जमीन खरडून गेली असून त्यामध्ये अनेक गावे बाधित आहेत त्यामध्ये हजाराच्या जवळपास शेतकरी आहेत. या वरील सर्व बाबींचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करुन उदगीर-जळकोट तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीबाबत तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती आ.संजय बनसोडे यांनी केली आहे.
*****************************

Post a Comment

0 Comments