उदगीर तालुक्यातील कौळखेड व गुडसूर येथे नवीन ३३/११के.व्ही उपकेंद्र मंजूर
कोळनुर व वांजरवाडा येथे अतिरिक्त 05 एम. व्ही. ए .क्षमतेचे विद्युत रोहीञ मंजुर
उदगीर : तालुक्यातील कौळखेड व गुडसुर येथे वीज वितरण कंपनीचे ३३ /११ उपकेंद्र उभारणी करण्यास राज्य शासनाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. यासाठी या भागातील शेतकरी बांधवांनी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्याकडे साकडे घालुन सदर ठिकाणी उपकेंद्र व्हावे याकरिता वेळोवेळी निवेदन दिले होते. तसेच शेतकरी बांधवांना विनाखंड विद्युत पुरवठा सुरळीत होत नव्हता त्या अनुषंगाने राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कडुन कौळखेड व गुडसुर येथे सदर उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे .
याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, कृ. उ. बा. उदगीर सभापती सिध्देश्वर पाटील, भारतीय कॉंग्रेस पक्षाचे जळकोटचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, अर्जुन आगलावे, भारतीय कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, मारोती पांडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगटोल, संगमेश्वर टाले यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच जळकोट तालुक्यातील कोळनूर व वांजरवाडा येथील उपकेंद्राची क्षमता वाढ करून या दोन्ही ठिकाणी ०५ एम. व्ही. ए. ते १० एम. व्ही. ए. ची रोहित्र बसविण्याची राज्यमंत्री बनसोडे यांनी मंजुरी घेतली आहे. यासाठी ११ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे.
या कामांमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा योग्य दाबाने व अखंडित मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मतदारसंघातील जनता संजय बनसोडे यांचे अभिनंदन करीत आहेत.
0 Comments