सोयाबीन खरेदीला शासनाची मुदतवाढ
पणन मंत्री जयकुमार रावल यांची आमदार संजय बनसोडे यांनी घेतली भेट
उदगीर : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील असतात त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसापासून शासनाच्या धोरणानुसार सोयाबीनच्या खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने सोयाबीन खरेदी होत नव्हती मात्र शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे शेतक-यांनी विनंती केली होती. याची दखल घेवुन आपण एक भुमीपुत्र व आपले कर्तव्य समजुन शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार करुन माजी क्रीडामंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली.
या मागणीचा पणन मंत्र्यांनी सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून सर्व शेतकरी बांधवांचे सोयाबीन आता खरेदी होईल अशी अपेक्षा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आमदार संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहून आमदार संजय बनसोडे हे काम करत असल्याने उदगीर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आमदार संजय बनसोडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.
***************
0 Comments