GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पोलीस पाटलांनी नेहमी सत्याच्या बाजुने रहावे : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

पोलीस पाटलांनी नेहमी सत्याच्या बाजुने रहावे : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

पोलिस पाटलांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न करणार

उदगीर : गावातील तंटे कमी करण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून राज्य शासनाने पोलीस पाटलांची नियुक्ती केली.
पोलीस पाटील हा गाव गाड्यातील महत्वाचा घटक असुन गावातील वादात कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्नशील रहावे. पोलीस पाटलांनी आपल्या गावात जात - पात , जवळचे दुसरचे व पक्ष असा भेदभाव न करता सत्याच्या बाजूने राहून आपली सेवा बजावावी असे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

उदगीर व जळकोट तालुक्यातील पोलिस पाटलांच्या वतीने उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना लातूरच्या वतीने
आयोजीत सत्कार सोहळ्यात बोलत होते.

यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र शेळके, दिलीप पाटील, हनुमंत शेळके, सोमेश्वर पारगे, एकनाथ कसबे, प्रा. शाम डावळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, अंकुश वाघे, दत्ता श्रीमंगले, ओंमकार कवठाळे, ज्योती बिरादार, विश्वास नरले पाटील, धनराज पाटील, छावाचे दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, 
पोलीस पाटलांच्या मानधन वाढीसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. परवाच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या - त्या गावातील पोलीस पाटलांची भुमिका महत्वाची होती. माझ्या या विधानसभेतील ऐतिहासिक विजयामध्ये पोलीस पाटलांचेही योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व समस्या आपण प्राधान्याने सोडवणार असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीर व जळकोट तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**************

Post a Comment

0 Comments