GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा - राज्यमंत्री संजय बनसोडे


बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा  - राज्यमंत्री संजय बनसोडे


राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वीज पडून पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप

 उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, हमाल, मापडी व व्यापारी या सर्व घटकांचे हित जपत आहे. बाजार समितीने पुढील काळात  शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समितीला या कामासाठी  शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री  संजय बनसोडे यांनी दिली.
      उदगीर तालुक्यातील वीज पडून पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या वतीने प्रत्येकी 21 हजार रुपयांची मदतीचा धनादेश राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील होते तर उपसभापती रामराव बिरादार, कल्याण पाटील,  विजय निटूरे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बालिका मुळे यांच्यासह बाजार समितीचे संचालकांची उपस्थिती होती.
         यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले की,  उदगीरच्या बाजार समितीने विकास कामाचा आराखडा तयार करून पाठवावा. आपण शासनाकडून या बाजार समितीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत,  शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविणारी ही बाजार समिती चांगले काम करत असल्याबद्दल श्री. बनसोडे यांनी कौतुक केले.
      यावेळी बोलताना सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी बाजार समितीने रस्ते, लाईट व अन्य दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत असताना सर्वांचे हित जोपासले असून कोविडच्या कामासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाला दहा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव भगवान पाटील यांनी केले.
                

Post a Comment

0 Comments