ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले जावेत : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
उदगीर : उदगीर शहराच्या शिक्षणाचा पॅटर्न सबंध महाराष्ट्रात असून विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या भागातील विद्यार्थी देशपातळीवर चमकत आहेत. प्रत्येक वर्षी हजार विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर व विविध क्षेत्रात यश संपादन करून आपल्या शहराचे नाव मोठे करत आहेत. उदगीर शहरातील सर्वच ठिकाणी ज्ञानदानाचे काम अतिशय पारदर्शक होत असून ज्ञानदानासोबतच विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले जावेत असे मत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विरभद्र घाळे,
माजी सभापती बापूराव राठोड, बाजार समितीचे संचालक श्याम डावळे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले,कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी उपनगराध्यक्ष नजीर हाशमी, मारोती घोणे, संजय सोळंके, संस्था सचिव प्रेमलता घाळे, डाॅ.भाग्यश्री घाळे, ऋतुजा घाळे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, आपल्या घराची श्रीमंती शिक्षणापासुन होते,
शिक्षणानेच माणूस विद्वान बनतो म्हणून आपण सर्वांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. आपल्या घराची श्रीमंती ही शिक्षणामुळेच होते.
ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलची वाटचाल सांगितली. आज पर्यंत या शाळेतील शेकडो विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर व उच्च पदावर कार्यरत आहेत विविध क्षेत्रात या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दरवर्षी या शाळेतील तीस ते पस्तीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बोर्डामध्ये मिरीट मध्ये येत असतात ज्ञानदानाच्या कार्यासोबतच एक देशाचा चांगला नागरिक म्हणून घडवण्याचे काम या संस्थेतून होत असते याचा मला मनस्वी आनंद आहे.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी, पालक, शाळेतील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
**********
0 Comments