आपल्या सर्वांचे माझ्यावरचे प्रेम हिच माझी शक्ती : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे
फुले, शाहु, आंबेडकरांचे विचार हीच आमची विचारधारा
मी मंत्री असुनही माझ्या अंत : करणात कार्यकर्ता जिवंत
उदगीर : मागील ५ वर्षाच्या काळात मतदार संघात ३ ते ४ हजार कोटींचा विकास निधी खेचुन आणुन मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला ते केवळ मतदार संघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच आता येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आपण सर्व बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाच्या घरात जावून आपले काम सांगा असे आवाहन करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मी फुले, शाहु, आंबेडकरांचे विचार कधीही सोडले नसल्याचे सांगून जमलेला अलोट जनसमुदायाला पाहुन
आपल्या सर्वांचे माझ्यावरचे प्रेम हिच माझी शक्ती असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील शिवम मंगल कार्यालयात
आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहर व ग्रामीण बुथ व कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकटराव बेद्रे, जिल्हाध्यक्ष अफसर शेख, पंडित धुमाळ, प्रदेश सरचिटणीस समीर शेख, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, खरेदी विक्री संघाचे भरत चामले, बाजार समितीचे संचालक प्रा.श्याम डावळे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, सुदर्शन मुंडे,तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, प्रकाश राठोड, उदय मुंडकर, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, फय्याज शेख, अॅड.दिपालीताई औटे, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, अभिजीत औटे, इम्तियाज शेख, खाजा तांबोळी, नजीर हाशमी, राजकुमार बिरादार,धनाजी मुळे, रोहिदास कुंडगिर, बाबुराव अंबेगावे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
मी सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा कॅबिनेट मंत्री केवळ आपल्या मताच्या तकतीने झालो असुन आपल्या मताची किंमत पक्ष नेतृत्वाने ठेवुन मला मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. मात्र मी आज राज्याचा मंत्री असुनही माझ्या अंत : करणात कार्यकर्ता जिवंत आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीत आपण जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्यातील 99% कामे पूर्ण केले असून उदगीर शहराचा जिल्ह्याच्या बरोबरीने विकास केला आहे. मागील चार वर्षाच्या काळात सर्व समाज घटकांना न्याय दिला असुन मतदार संघातील
अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीमागे मी नेहमी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही ना.बनसोडे यांनी दिली.
येत्या काळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या
अडचणी सोडवण्यासाठी या बैठकीचे आयोजन होते. त्यामुळे आपला बुथ प्रमुख मजबुत उभा राहुन सर्व कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका असा मंत्र ना.संजय बनसोडे यांनी उपस्थितांना दिला. मागील ५ वर्षे मी सदैव जनतेच्या सेवेत असुन माझ्या मतदार संघातील प्रत्येक गावात कमीत कमी १० ते २० वेळा जावून तेथील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. उदगीर - जळकोट तालुक्यासोबत ग्रामीण भागातील सर्व जनतेचे वीज, पाणी, आरोग्याच्या सुविधेसह सर्व मूलभूत सुविधा पुरविल्या येत्या काळात सर्व गावे स्मार्ट करण्याचा मानस असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीर शहर व तालुक्यातील बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments