GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

अव्होपाच्या रक्तदान शिबीरात ६५ जणांचे रक्तदान

अव्होपाच्या रक्तदान शिबीरात ६५ जणांचे रक्तदान

उदगीर : आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन उदगीर च्या वतीने संस्थापक सचिव कै.प्रा. सुनील वट्टमवार यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरात६५ जणांनी रक्तदान केले . रक्तदान शिबिराचे उद्घाटन  सिद्धेश्वर (मुन्ना)पाटील मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर यांच्या हस्ते झाले.तब्बल 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून कै प्रा सुनील वट्टमवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.या शिबीरास अंबरखाने ब्लड बँक व राधाई ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.

अव्होवाच्या  उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे. समाज  उपयोगी कार्य करणाऱ्या या  संघटननेने तयार बाल वाचनालय,विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, निराधार नागरिकांना किराणा घरपोच वितरण या .माध्यमातून केलेले  कार्य उल्लेखनीय आहे.  असे  मत   सिद्धेश्वर पाटील य यांनी   व्यक्त केले .विविध उपक्रमासाठी 51 हजार रुपये देणगी या संघटनेला श्री सिद्धेश्वर (मुन्ना)पाटील यांनी दिली .  विजयकुमार भीमाशंकर पारसेवार यांनी साऊंड सिस्टिम संच भेट दिला .  संध्या सुनील वट्टमवार यांनी पाच हजार रुपयाची देणगी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण मुक्कावार, प्रमुख अतिथी श्री सिद्धेश्वर( मुन्ना)पाटील ,श्री प्रल्हाद बोथीकर ,विजयकुमार पारसेवार,संदीप मोदी, संचालक सतीश उस्तूरे ,संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ दीपक चिद्दरवार, अध्यक्ष संजय चन्नावार , सचिव विजयकुमार गबाळे, कोषाध्यक्ष राकेश पांपट्टीवार, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर पारसेवार, सहप्रकल्प प्रमुख अनिरुद्ध मुक्कावार, बालाजी बुन्नावार,अनिल मारमवार, संजय  पत्तेवार, शंकर मुक्कावार, बालाजी पत्तेवार ,देविदास पारसेवार, संतोष मुर्के ,विठ्ठल बावगे, संतोष कोटगीरे,व्यंकटेश पारसेवार, योगेश जळकोटे, संदीप मुक्कावार , डॉ चंदावार, डॉ मालशेटवार, डॉ गुजलवार यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा डॉ दीपक चिद्दरवार ,मनोगत ज्ञानेश्वर पारसेवार,सूत्रसंचालन विजयकुमार गबाळे व आभार प्रदर्शन प्रा. संजय चन्नावार यांनी केले.

Post a Comment

0 Comments