विशेष सहाय्य योजनेअंतर्गत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योनजचे १२४६ लाभार्थ्यांचे अर्ज
मंजूर
उदगीर : राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजयजी बनसोडे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी लातूर व सुशांत शिंदे (उपविभागीय अधिकारी उदगीर) यांच्या मार्गदर्शनानुसार उदगीर तालुक्यात रामेश्वर गोरे (तहसीलदार उदगीर) यांच्या अध्यक्षेखाली संजय गांधी निराधार समितीची बैठक दि.०६.१२.२०२३ रोजी तहसील कार्यालय उदगीर येथे घेण्यात आलेली असून यामध्ये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योनजचे १२४६ लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना (अपंग, विधवा, परितक्त्या, अंतर्भुत पिडीत आजार इ.), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेच्या पात्र लाभार्थी यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, सदर बैठकीतील मंजूर लाभार्थी संख्या योजना निहाय खालील प्रमाणे आहेत.
श्रावणबाळ १०८० अर्ज, संजय गांधी निराधार योजना १६६ असे एकुण १२४६ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
सदरील या बैठकीस रामेश्वर गोरे, (तहसीलदार उदगीर), मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर, गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर, संतोष धाराशिवकर, (नायब तहसीलदार, संगांयो), सौ. तिडके यु.पी. (अव्वल कारकून, संगांयो), फुटाणे डी. आर (अव्वल कारकून,
संगांयो), समाधान कांबळे (आय. टी. असिस्टंट), प्रेमला गुंगनाळे (कोतवाल) आदी उपस्थित होते.
0 Comments