GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लालबहादुरमध्ये 'मूक वाचन साधना' उपक्रमाचे आयोजन

लालबहादुरमध्ये 'मूक वाचन साधना' उपक्रमाचे आयोजन
          
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिनव मानवंदना
उदगीर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सलग पाच तासाच्या 'मूक वाचन साधना' उपक्रमाचे आयोजन करून महामानवाला अभूतपूर्व अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमात 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध पुस्तकांचे वाचन केले.या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड तर प्रमुख अतिथीस्थानी अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले,आशा मोरे ,कु.श्रद्धा उप्पे इ.मान्यवर उपस्थित होते.
     प्रारंभी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.चि.यशवंत गायकवाड व कु.ऋतूजा मस्के या विद्यार्थ्यांनी भीमगीत गायले. प्रास्ताविकातून कु.संध्या मदने  हिने आंबेडकरांच्या अफाट ज्ञानसंग्रहाची व वाचनाच्या व्यासंगाची माहिती देत अभ्यासिकेच्या आयोजनाचे प्रयोजन स्पष्ट केले.
    प्रमुख अतिथी कु.श्रद्धा उप्पे या विद्यार्थींनीने 18 तास अभ्यास करणारे बाबासाहेब यांचे चरित्र मुलांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. व्यक्ति म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा असा आंबेडकराचा संदेश असल्याचे नमूद केले.प्रमुख अतिथी बालाजी पडलवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक, न्याय, साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाविषयी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.तसेच आशा मोरे यांनी संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अंबादास गायकवाड यांनी  'मूक वाचन साधना' उपक्रमातील सहभागी वाचक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु .अंबिका ढोबळे हिने केले तर पाहूण्यांचा परिचय कु.वैष्णवी विरकपाळे हिने करून दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबिका पारसेवार,आशा गौतम,रागिणी बर्दापूरकर,सुरेखा शिंदे,प्रिती शेंडे,गुरूदत्त महामुनी ,बालाजी जाधव, मिनाक्षी कस्तूरे ,निता मोरे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments