एस.यु. देवणे ज्वेलर्सचे उद्घाटन दि. ०८ डिसेंबर २०२३ रोजी
उदगीर : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षण निदेशक उमाकांत भिमराव देवणे यांच्या एस. यु. देवणे सोने चांदीचे व्यापारी या नवीन फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा हावगीस्वामी मठ उदगीरचे ष. ब्र .प .पू .डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दि. ०८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२:२७ वा. उद्योग भवन दुकान क्रमांक ६७ व ६८ याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी उदगीरचे माजी आमदार गोविंदजी केंद्रे , माजी आमदार मनोहरराव पटवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे , उद्योगपती चंद्रकांतजी मुक्कावार, ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, पत्रकार बांधव व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उमाकांत देवणे यांनी भारतीय सैन्यात सेवा करुन सेवानिवृत्त झाल्यानंतर उदगीर येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात शिक्षण निदेशक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, संस्कार, सहकार्य, सहानुभूती, आदरभाव इ. भावना निर्माण करण्याचे अतुलनीय कार्य केले आहे.
सेवानिवृत्त शिक्षण निदेशक उमाकांत देवणे यांनी आपल्या मुलासाठी एस. यु. देवणे ज्वेलर्स सोने चांदीचे व्यापारी या नवीन फर्मची सुरुवात करुन उदगीर परिसरातील जनतेला उच्च दर्जाचे दागिने उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केली आहे.
उदगीर परिसरातील अधिकाधिक जनतेनी एस .यु .देवणे या फर्मला भेट द्यावे अशी विनंती उमाकांत देवणे यांनी केली आहे.
0 Comments