GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

किसान शिक्षण प्रसारक मंडळाला बदनाम करण्याचे षडयंत्र - सचिव ज्ञानदेव झोडगे

किसान शिक्षण प्रसारक मंडळाला बदनाम करण्याचे षडयंत्र - सचिव ज्ञानदेव झोडगे

उदगीर : 'उलटा चोर कोतवाल को डाटे'  या उक्तीप्रमाणे मंडळातील काही व्यक्ती आपल्याच शिक्षण मंडळाची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र काही व्यक्ती करत असुन ज्या व्यक्ती स्वतः चोर आहेत त्या दुसऱ्यांना चोर ठरवण्याचा प्रयत्न  करत  असल्याचा आरोप किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.

दि.२८ जुलै  रोजी विद्यावर्धिनी हायस्कूल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.विजयकुमार बाबाराव पाटील यांच्या निधनानंतर कार्यकारणीतील नऊ संचालकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला उपाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतू या बैठकीत ९ पैकी ६ सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. मंडळाच्या विरोधात काम करणारे, बाहेरच्या काही व्यक्तींचं माहोल बणून काम करणारे उपाध्यक्ष या बैठकीस गैरहजर राहिले. उपस्थित सहा सदस्यांनी बैठकीचा कोरम पूर्ण झाल्यामुळे, बहुमताने अध्यक्ष म्हणून  श्रीरंगराव पाटील यांची निवड करण्यात आली.  हा ठराव चेंज रिपोर्टसाठी धर्मादायला दाखल करण्यात आला. सदरील सर्व पुरावे प्रसार माध्यमांना दाखविण्यात आलेले असून, बोगस अध्यक्ष म्हणून  बदनामी करण्यासाठी रचलेला कट असल्याचे संचालक आजित पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले .
   प्रसार माध्यमांमध्ये मंडळाची बदनामी करणारे मंडळाचे संचालक व मंडळाचे  स्वंयघोषित सचिव यांचा तर कारभार अजबच आहे. उलटा चोर कोतवाल को डॉंटे या म्हणीप्रमाणे ते स्वतः भ्रष्टाचारात बरबटलेले असून मंडळाचे सदस्य नसणाऱ्या व्यक्तीला अध्यक्ष घोषित करत  स्वतःला मंडळाचा सचिव घोषित करून यांनी मंडळात बऱ्याच अफरातफरी केलेल्या असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत.
 हेळंब येथिल शाळेतील  स्वंयघोषित सचिवाने मुख्याध्यापकाचा जी. पी. एफ उचलण्यासाठी सचिव म्हणून  बोगस सह्या करुन मोठी रक्कम त्या मुख्याध्यापकाकडून  उकळले असल्याचे ऐकण्यात आहे. विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर येथील पर्यवेक्षक बांगे व्ही.एम यांची सेवा जेष्ठता डावलून पदोन्नती देण्यासाठी या  स्वंयघोषित सचिवांनी स्वात:च्या स्वाक्षरीने शिक्षण विभागात प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोठी रक्कम वसूल केले असल्याची चर्चा आहे .
तसेच सचिव नसताना असे बरेच कारभार त्यांनी मंडळात करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून मंडळातील एका कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर 420 ची कलम लागू केली. कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी मागून हा पैसे वसुलीचा कार्यक्रम बंद केला असल्याची माहीती संस्थेचे संचालक अजित पाटील यांनी दिली.
        यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, सहसचिव माधवराव पाटील, कोषाध्यक्ष नामदेवराव चामले, कार्यकारणी संचालक गुंडेराव पाटील, पी टी शिंदे, अजित पाटील तोंडचीरकर, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, विद्यावर्धिनी हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक  बी . बी . नागरवार , प्राथमिक  शाळेचे मुख्याध्यापक बि. व्हि. अजने, बंडु पाटील  आदि उपस्थित होते.
     

चौकट:-शासनाच्या नियमाप्रमाणे, त्यांनी ठरवून दिलेल्या अटीनुसार दररोज उत्कृष्ट असा आहार विद्यार्थ्यांना पुरवला जातो. विद्यार्थी मध्यान भोजन करण्यापूर्वी बनवलेल्या अन्नाची तपासणी  शिक्षक स्वतः खात विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहत असतात. विद्यार्थ्यांच्या मध्यान भोजनाची तपासणी वारंवार शासकीय अधिकाऱ्याकडून झालेली आहे.शासनाने ठरून दिलेल्या नियमा नुसार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो यामध्ये कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही .आम्ही खर्च केलेला निधी शासनाकडून आमच्या खात्यावर जमा होतो व तो निधी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने उचलला जातो. यामध्ये कोणत्याही पद्धतीने नियमांचे उल्लंघन केले जात नाही असे पोषण आहार प्रमुख  एम. एस. जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments