GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मादलापुर येथील महावितरणच्या उपकेंद्रासाठी ४ कोटी रुपयाचा निधी मंजूर

मादलापुर येथील महावितरणच्या उपकेंद्रासाठी ४ कोटी रुपयाचा निधी मंजूर

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश

उदगीर : मतदार संघात विविध योजनेच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी या मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे सदैव प्रयत्नशील असतात. उदगीर तालुक्यातील मादलापुर परिसरासह आजुबाजुच्या गावातील नागरिकांना नेहमीच विजेची समस्या भेडसावत होती. या भागातील ग्रामस्थांनी ना.बनसोडे यांना विनंती केल्याने ग्रामस्थ व शेतक-यांच्या मागणीचा तात्काळ विचार करुन ना.बनसोडे यांनी मादलापुर येथे ३३/११ के.व्ही. १x५  mva महावितरणचे उपकेंद्र मंजूर करुन त्यासाठी तब्बल ४ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.
सदर महावितरणचे उपकेंद्र मंजूर झाल्याने या भागातील शेतकऱ्यांचा व नागरीकांचा प्रश्न सुटणार असुन या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना विजेबद्दक वारंवार अडचणी येत होत्या या बाबींचा विचार करुन
ना. संजय बनसोडे यांनी वैयक्तिक लक्ष देवून या भागातील नागरीकांची गैरसोय दुर व्हावी म्हणून नव्याने मादलापुर येथे महावितरणचे उपकेंद्र मंजूर करावे अशी मागणी गेल्या काही  दिवसापुर्वी ऊर्जा विभागाकडे केली होती. आज त्यांच्या प्रयत्नाला यश आले असुन 
या मादलापुर येथे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्राचा फायदा उदगीर तालुक्यातील मादलापुर, मोघा, मलकापूर, बनशेळकी, तिवटग्याळ, हैबतपुर व उदगीर शहरातील मादलापुर हद्दीतील नागरिकांना होणार असल्याने ना.संजय बनसोडे यांचे मादलापुरसह परिसरातील नागरिकांनी अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
या उपकेंद्राचा उदगीर तालुक्यातील मादलापुरसह आजुबाजुच्या शेतकऱ्यांना व औद्योगिक क्षेत्रात कारखाना विद्युत पुरवठा सुरळीत आणी योग्य दाबाने होण्यास मदत होणार आहे. भविष्यात या भागात विजेची समस्या उद्भवणार नसल्याने नागरीकांतुन समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments