उदगीर शहरात महापुरुषांच्या जीवनावर आधारित भव्य राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन
उदगीर : येथील उदयगिरी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ उदगीर आयोजीत...
जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर,
महात्मा ज्योतीबा फुले, विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उदयगिरी सांस्कृतीक व क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खुल्या भीम गीत, बसव गीत सह महापुरुषांवर आधारीत गीत गायन स्पर्धा 2023 "महाराष्ट्राचा सुरसम्राट" या स्पर्धेचे आयोजन दि.२९, ३० एप्रिल २०२३
शनिवार, रविवार वेळ : सायं ४ वा. नगर परिषद, व्यापारी संकुल समोरील मैदान, उदगीर जि.लातूर येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 21132/-₹ द्वितीय 11132/-₹ तृतीय 7132/- ₹ व उत्तेजनार्थ 2132/-₹ ची तीन रोख पारितोषिके, गौरव चिन्ह व राज्यघटनेची प्रस्ताविका देण्यात येणार आहे. "महाराष्ट्राचा सुरसम्राट" स्पर्धेचे ऑडिशन रविवार दि.16 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 वा पर्यंत मातृभुमी महाविद्यालय, देगलूर रोड, उदगीर येथे होणार आहे. कलावंतानी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा.बिभिषण मद्देवाड 9823160552 व प्रा.नागनाथ गुट्टे 9421985154 यांच्याशी संपर्क साधावे. या स्पर्धेत जास्तीत जास्त गायक कलावंतानी सहभागी व्हावे असे आवाहन उदयगिरी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनिल हावा , कार्याध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड , सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी ,उपाध्यक्ष बसवेश्वर डावळे ,कोषाध्यक्ष नागनाथ गुट्टे व संयोजन समितीने केले आहे.
0 Comments