माजी मंत्री आ.संजय बनसोडे जपान
अभ्यास दौऱ्यासाठी रवाना
उदगीर : उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे दि. 9 एप्रिल रोजी उदगीर येथुन जपान अभ्यास दौऱ्यावर गेले असून जपान येथे विविध स्थळांना भेटी देऊन तेथील आवश्यक त्या सर्व बाबींचा अभ्यास करून आपल्या मतदारसंघासाठी नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व नेत्यांसह समाज बांधवांनी उदगीर रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांना जपान दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाजार समितीचे उपसभापतीची माजी रामराव बिरादार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, शिवसेना तालुकाप्रमुख कैलास पाटील, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कुणाल बागबंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख मुन्ना पांचाळ, मादलापूर सरपंच उदयसिंह मुंडकर, संघशक्ती बलांडे, राजकुमार गंडारे, सतिश कांबळे, बाळु सगर, अजहर मोमीन, दयानंद शिंदे, बाळासाहेब नवाडे, व्यंकट वाघमारे, अभिजित औटे, विकास जाधव, आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखा तर्फे आयोजित दिनांक 11 एप्रिल ते 21 एप्रिल या कालावधीत जपान येथे महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौऱ्यासाठी जात असल्या निमित्ताने मतदार संघातील असंख्य जनतेनी रेल्वे स्टेशन येथे येऊन शुभेच्छा दिल्या याबद्दल तमाम जनतेचे आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments