GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासाकरिता मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर

मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासाकरिता मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर

मतदार संघातील ५३ गावांसाठी निधी उपलब्ध; आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश


उदगीर : उदगीर - जळकोट मतदार संघातील मूलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून उदगीर - जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडे मागणी केली होती त्यांच्या या मागणीचा विचार करून उदगीर तालुक्यातील २८ गावे व जळकोट तालुक्यातील २५ गावे असे दोन्ही मिळून मतदार संघातील ५३ गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार संजय बनसोडे यांनी दिली.
यामध्ये उदगीर तालुक्यातील बेलसकरगा, वाढवणा बु., दावणगाव, डाऊळ, येणकी, वाढवणारी खु., रावणगाव, लोहारा, डोंगरशेळकी, जंगमवाडी, बनशेळकी, देवर्जन , मलकापूर, हाळी, मन्ना उमरगा, मोर्तळवाडी, हेर, कोदळी, दावणगाव, जकनाळ, शंभु उमरगा, तोंडचीर, नागलगाव, तोंडार, चांदेगाव, मोघा, कल्लुर, नेत्रगाव आदी गावांसाठी २ कोटी ७६ लक्ष रुपये  तर जळकोट तालुक्यातील बोरगाव, उमरगा रेतु, डोंगरकोनाळी, पाटोदा बु., सोनवळा, धामनगाव, मंगरूळ, बोरगाव, विराळ, जगळपुर, वांजरवाडा, शेलदरा, धोंडवाडी, येवरी, रावणकोळा, फकरु तांडा, मेवापुर, शिवाजीनगर तांडा, होकर्णा, सुल्लाळी, येलदरा, धामणगाव, एकुर्का, पोमा तांडा, तिरुका, आदी गावांसाठी २ कोटी २४ लक्ष रुपये असे उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याकरिता आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments