उदगीर - जळकोट तालुक्यातील विकास कामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून ११ कोटी २७ लाख रुपयाचा निधी मंजुर
आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश
उदगीर : उदगीर - जळकोट तालुक्यातील विकास कामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून ११ कोटी २७ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आपल्या मतदार संघातील विविध कामाचा आढावा घेवुन आ.संजय बनसोडे यांनी प्रत्येक गावातील गरजा लक्षात घेवुन मतदार संघात निधी उपलब्ध करुन द्यावा म्हणून ते पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असुन मतदार संघात विविध विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी जिल्हा वार्षिक नियोजन विभागातुन उपलब्ध करण्यात आला आहे.
यामध्ये उदगीर तालुक्यातील
होनीहिप्परगा, हिप्परगा डा. , सताळा, सताळा बु., शंभू उमरगा, वायगाव, मल्लापुर, मादलापुर, बामणी, पिंपरी, नावंदी, देवर्जन, तोंडार, डिग्रस, जानापुर, गुडसुर, गंगापुर, कुमदाळ, कल्लुर, शिरोळ जा., निडेबन, डांगेवाडी, दावणगाव, तोंडचिर, शेल्हाळ, डोंगरशेळकी, करडखेल, हणमंतवाडी, कुमठा, मोघा, इस्मालपुर, नळगीर या गावतील विविध कामांसाठी ३ कोटी २९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन यामध्ये समशानभूमी, संरक्षण भिंत, स्मशान भुमी शेड , पेव्हर ब्लॉक , सिमेंट रस्ता, पथदिवे, सौरदिवे आदी कामासाठी हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
तर जळकोट तालुक्यातील सोनवळा, वांजरवाडा, लाळी खु., धोंडवाडी, घोणसी, चिंचोळी, रामपुर तांडा, गुत्ती, आदी गावांसाठी ९१ लाख ४७ हजार रुपयाची निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आ.संजय बनसोडे यांनी ग्रामीण भागातील नागरीकांच्या भेटी घेवुन त्यांच्या अडचणी जाणून घेत असतात व ग्रामस्थांना विविध योजनेतून मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळेच मतदार संघाचा कायापालट होत असुन आजतागायत कोट्यावधिचा निधी आणुन त्यांनी मतदार संघाचा कायापालट केला आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून उदगीर तालुक्यातील येणकी, नावंदी, कौळखेड, माळेवाडी, इस्मालपुर, लोणी, रावणगाव, सोमनाथपुर, तोंडचिर, जानापुर, बामणी, चॊंडी, नागलगाव, शेल्हाळ, तोगरी, करडखेल, मल्लापुर, आदी गावांसाठी १ कोटी ५३ लाख तर जळकोट तालुक्यातील गुत्ती, रामपुर तांडा, वांजरवांडा, तिरुका, सुल्लाळी, राठोड तांडा आग्रवाल तांडा, मरसांगवी, शिवाजी नगर तांडा, केकतसिंदगी, जगळपुर बु., शेलदरा, माळहिप्परगा, अतनुर चिंचोळी आदी गावासाठी ९१ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण ५०५४ योजनेअंतर्गत सताळा बुद्रुक ते वायगाव रस्त्यासाठी ५० लाख रुपये तर ३०५४ योजनेतुन उदगीर तालुक्यातील हेर ते ग्रामीण रस्ता क्रं २८ राज्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ३० लाख रु,देऊळवाडी ते गुंडोपंत दापका रस्त्यासाठी २० लाख रु, गुडसुर ते नावंदी रस्त्यासाठी २५ लाख रु, राज्यमार्ग २४५ ते हेर मजबुतीकरणासाठी रस्त्यासाठी २० लाख रु, रावणगाव ते खतगाव रस्त्यासाठी ९ लाख रुपये, नेत्रगाव ते येणकी रस्त्यासाठी ९ लाख रुपये, तर जळकोट तालुक्यातील रुपला तांडाग्रामीण रस्ता क्रं ते रुपला तांडा रस्त्यासाठी ३० लाख रुपये असे एकुण रस्त्यासाठी २ कोटी ११ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीतून प्राथमिक आरोग्य केंद्रा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यामध्ये उदगीर तालुक्यातील गुडसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शव विच्छेदन गृह मुख्य पेव्हर ब्लॉक रस्ता बांधकाम करणे व स्वतंत्र विद्युत रोहित बसविण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर
जळकोट तालुक्यातील मंगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या उर्वरीत बांधकाम व उर्वरित रस्ता करण्यासाठी ७० लाख रुपये तर घोणसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत व इतर अनुशांघिक बांधकाम करण्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपये असे एकुण २ कोटी ९ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर ' क ' वर्ग तिर्थक्षेत्र यात्रा स्थळाच्या विकासासाठी उदगीर तालुक्यातील शंभू उमरगा येथील महादेव मंदिर परिसर सुधारणा करणे १० लाख रुपये तर नळगीर येथील बापुदेव महाराज मंदिर परिसरात सौर पथदिवे बसविणे तर जळकोट तालुक्यातील बोरगाव येथील ब्रम्हदेव मंदिर देवस्थान परिसरात सौर पथदिवे बसविण्यासाठी ५ लाख रुपये असुन एकुण जिल्हा नियोजनमधुन ११ कोटी २७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन घेतल्याने माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांचे यांच्या प्रयत्नाला यश आले असून जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून निधी मंजुर केल्याबद्दल पालकमंत्री गिरीष महाजन यांचे आमदार संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments