लोकशाही वाचवण्यासाठी संविधान बचाव यात्रा गावा गावात काढणार : माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणा देवुन केला केंद्र शासनाचा निषेध
उदगीर : कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत खा.राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा ' काढली त्यामुळेच विरोधकांनी खा.राहुल गांधी यांना अडचणीत आणुन चुकीच्या पध्दतीने राजकारण केले असुन भविष्यात आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर आपण सर्वांनी घराघरात जावुन लोकशाहीचा जागर करावा लागणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेवुन प्रत्येक गावा गावात जावून संविधान बचाव यात्रा काढणार असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते लोकशाही विरोधी केंद्र व राज्य सरकारच्या कृत्याच्या निषेधार्थ सत्यागृह धरणे आंदोलनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश्वर निटुरे, ज्येष्ठ नेते रंगा राचुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी उपसभापती रामराव बिरादार, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील, श्रीमंत सोनाळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, राष्ट्रवादीचे शहाध्यक्ष समिर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष मुन्ना पांचाळ, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुर्यशिला मोरे, माजी उपनगराध्यक्ष फैजु पठाण, शिवकुमार हसरगुंडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगराध्यक्ष प्रा.रामकिशन सोनकांबळे, माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, विजयकुमार चवळे, व्यंकटराव पाटील, सोपानराव ढगे, मधुकर एकुर्केकर, विनोबा पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, फय्याज शेख, मेहबुब शेख, राजकुमार भालेराव, चंद्रकांत टेंगेंटोल, बबिता भोसले, डाॅ.भाग्यश्री घाळे, ललिता झिल्ले, सुर्यशिला मोरे, सरोजा बिरादार, रेखा कानमंदे, उर्मिला वाघमारे, चारुशिला पाटील, नवनाथ गायकवाड, सुनिल केंद्रे, ज्ञानोबा गोडभरले, संतोष तोडकर, बालाजी देमगुंडे, पंडितनाना ढगे, धिरज कसबे, शफी हाशमी, राजकुमार हुडगे, धनाजी मुळे, शशिकांत बनसोडे, गोविंद भालेराव, महेश भंडे, एस.पी.पाटील, दत्ता सुरनर, विपुल सुडे,
श्रीनिवस एकुर्केकर, दत्ता बामणे, संतोष बिरादार, माधव कांबळे, समद शेख, बाबासाहेब सुर्यवंशी, रऊफ थोडगे, अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, या देशाची प्रगती ही केवळ मागील ५-७ वर्षात झाली नसून मागील ७५ वर्षाच्या काळात ज्या - ज्या नेतृत्वांनी या देशाचे नेतृत्व केले त्यांच्यामुळेच आपल्या देशाची प्रगती झाली असुन आपल्याला पुढच्या पिढीला हा इतिहास सांगावा लागणार आहे. येत्या २०२४ च्या निवडणूकीत जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला नाही आणि सत्ता जर विरोधी पक्षाकडे गेली तर लोकशाही राहिल का नाही माहित नाही या बाबत सर्वसामान्य नागरीकांच्या मनात शंका आहे. आपण इतिहासात जावून पाहिले तर आपल्या महापुरुषांनी त्यांच्या विचाराची चळवळ उभी केली होती . आज आपल्याला ही तशी चळवळ उभारण्याची गरज आहे. लोकाशाहीचा जागर करुन घराघरात जावून आपण जनजागृती करायला हवी तरच लोकशाही टिकेल. सत्ता ही उपभोगण्यासाठी नसुन सत्तेमधुन सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. उद्याच्या २ एप्रिल रोजी संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चामध्ये सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी म.गांधी उद्यानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात'मोदी हटाव, देश बचाव', हल्लाबोल , हल्लाबोल हुकूमशहापर हल्लाबोल, मोदी अदाणी भाऊ - भाऊ, दोघे मिळून एकत्र खाऊ...लडेंगे भी, और जितेंगे भी अशा घोषणा देवुन निषेध केला.
यावेळी महाविकास आघाडी सह समविचारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments