GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

रंगकर्मी प्रतिष्ठाण व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर


रंगकर्मी प्रतिष्ठाण व मराठी पत्रकार संघाचे 
राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ पत्रकार एम.बी. पटवारी यांना जीवनगौरव तर जय महाराष्ट न्युज चॅनलचे सचिन अंकुलगे यांना विशेष गौरव 

२९ जानेवारीला होणार पुरस्कार वितरण सोहळा

 उदगीर : मागील ३ वर्षापासुन येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा  राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले असुन यामध्ये शोधवार्ता गटामधुन दै.देशोन्नतीचे लातूर जिल्हा प्रतिनिधी विनोद उगीले यांच्या 'वयोवृध्द महिलांनी वाढवला कागदोपत्री गर्भ ' या बातमीला प्रथम तर व्दितीय चाकुर येथील दै.पुढारीचे प्रतिनिधी संग्राम वाघमारे यांच्या ' २३ जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर' आणि तृतीय जळकोट येथील दै.एकमतचे प्रतिनिधी ओमकार सोनटक्के यांच्या ' पंचेवीस वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या चकरा...' या बातमीस जाहीर झाला असुन उत्कृष्ट वार्ता गटात लातूर येथील दै.पुण्यनगरीचे उपसंपादक पुरूषोत्तम भांगे यांच्या 'शासकीय बालगृहाच्या अधीक्षकासह सहा कर्माचा-यावर गुन्हा दाखल...' तर व्दितीय औसा येथील दै.सकाळचे प्रतिनिधी जलील पठाण यांच्या ' सुवर्णपदक विजेतीवर ऊस तोडीला जाण्याची वेळ, चितपट करण्याची उर्मी असलेली लक्ष्मी आर्थिक अडचणीमुळे हतबल' तर तृतीय उदगीर येथील रफ्तार हिंदुस्थानकीचे संपादक इरफान शेख यांच्या 'नॅशनल हायवे बना मौत का अड्डा, हरदीन दुर्घटनाए' या बातमीस तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असुन रंगकर्मी व मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन्ही गटासाठी रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून दि.२९ जानेवारी रोजी उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
यामध्ये शोधवार्ता गटातील प्रथम  ३००१ ₹ चे पारितोषिक कै.गौतम संभाजीराव सुर्यवंशी यांच्या स्मरनार्थ संघाचे सचिव सिध्दार्थ संभाजीराव सुर्यवंशी यांच्या वतीने रोख रक्कम व गौरवपत्र तर व्दितीय पारितोषिक २००१/-  संघाचे सहसचिव सुधाकर किशनराव नाईक यांच्या वतीने रोख रक्कम व गौरवपत्र तर तृतीय पारितोषिक संदिप मद्दे यांच्या वतीने रोख १००१/- रु व गौरवपत्र देण्यात येणार आहे तर दुस-या गटातील उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पारितोषिक  ३००१ ₹ चे कै.व्यंकटराव सगर यांच्या स्मरनार्थ संघाचे उपाध्यक्ष  प्रा.भगिरथ सगर यांच्या वतीने रोख रक्कम व गौरव चिन्ह  तर व्दितीय पारितोषीक कै.राजकुमार मुनाळे यांच्या स्मरनार्थ संघाचे सदस्य मनोहर लोहारे यांच्या वतीने   २००१ ₹ रोख रक्कम व गौरवपत्र तर रंगकर्मीचे उपाध्यक्ष संदिप मद्दे यांच्या वतीने तृतीय पारितोषीक १००१ रूपये  
रोख रक्कम व गौरवपत्र देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
 रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बिभीषण  मद्देवाड , सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा.भगिरथ सगर, बस्वेश्वर डावळे,सहसचिव सुधाकर नाईक, कोषाध्यक्ष बबन कांबळे, सदस्य नागनाथ गुट्टे, मनोहर लोहारे, संग्राम पवार, अझरोद्दीन शेख, शंकर बोईनवाड, अरविंद पत्की, अंबादास अलमखाने, अशोक तोंडारे यांच्यासह अँड.विष्णु लांडगे, अँड. महेश मळगे,  प्रा.रामदास केदार, रसुल पठाण, लक्ष्मण बेंबडे, संदीप मद्दे, मारोती भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments