GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आजच्या स्त्रियांचा गौरव : प्राचार्य उषा कुलकर्णी

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आजच्या स्त्रियांचा गौरव : प्राचार्य उषा कुलकर्णी

उदगीर : आज स्त्रिया शिक्षित झाल्या, बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे आणि महिलांचे कल्याण झाले. किंबहुना महिलांचा सर्वञ होत असलेला सन्मान हा सावित्रीबाई फुले यांच्यामुळेचअसल्याचे मत प्राचार्या उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले .
त्या मातृभूमी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजीत कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.  
यावेळी प्रा .आश्विनी देशमुख, प्रा. रुपाली कुलकर्णी, प्रा. रेखा रणक्षेञे , ग्रंथपाल उषा सताळकर , जगदिशा ओंकारे यांची उपस्थिती होती. 
पुढे बोलतांना प्राचार्या कुलकर्णी म्हणाल्या साविञीबाई फुले ह्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केल आणि समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या.
ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी १८ शाळा सुरु केल्या परंतू त्यांचा प्रवास आतिशय कठीण परिस्थितीतून झाला. जेव्हा स्ञीयांनी शिक्षण घेऊच नये अशी परिस्थिती होती  समाजकंठकांचा विरोध झुगारुन  स्वत:शिक्षण घेवुन स्ञीयांना शिक्षणाची दारे उघडी केली त्यांच्या या त्यागामुळेच आज समाजातील स्ञीया प्रत्येक क्षेञात आग्रेसर आहेत.
सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे, ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा मांडली जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले. म्हणून साविञीबाईं फुले यांनी स्ञी शिक्षणासाठी दिलेले योगदान अनन्य साधारण असल्याचे त्यांनी सांगितले.
 कार्यक्रमाचे सुञसंचलन कार्यक्रमाधिकारी  प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी तर आभार प्रा. मिरा पाटील यांनी मानले.
  यावेळी प्रा.उस्ताद सय्यद ,प्रा.  रणजित मोरे ,प्रा. रुपाली कुलकर्णी  ,प्रा. धोंडीबा जोशी , नंदु बयास  , संतोष जोशी , आकाश राठोड , अन्वेष हिपळगावकर , प्रा. अश्या पवार  , प्रा.राजेश चटलावार , राष्ट्रीय सेवायोजना विभागाचे स्वंयसेवक ,विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments