विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासाचे शिल्पकार बनावे : खा. सुधाकर शृंगारे
उदगीर : येथील लालबहादुर शास्त्री शैक्षणिक संकुलात गेल्या बेचाळीस वर्षांपासून सुरू असलेला मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी स्तुत्य उपक्रम असून,आजचे विद्यार्थी उद्याच्या देशाचे शिल्पकार आहेत. ते होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खा. सुधाकर शृंगारे यांनी केले. या विद्यालयातून अनेक चांगले विद्यार्थी घडत असून ते देश विदेशात मोठमोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत.बुद्धिमत्ता वाढीसाठी अशा वादविवाद स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात आंतर शालेय वादविवाद स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खा. शृंगारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर होते. अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले ,"काहीतरी करण्याचा प्रयत्न करा.काय करायचे ते ठरवून मार्गक्रमण करा. म्हणजे ध्येय आपोआप गाठले जाईल." तसेच त्यांनी वादविवाद स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी लातूर जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडे, तसेच तज्ञ परीक्षक प्राध्यापक डॉ. माधव चोले, प्रा. गौतम गायकवाड ,डॉ. ज्ञानोबा मुंडे, संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य तथा स्थानिक कार्यवाह शंकरराव लासूने ,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सतनप्पा हुरदळे , रामकृष्ण सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष डॉ. प्रशांत राजुरकर , स्वामी विवेकानंद वसतिगृहाचे अध्यक्ष षन्मुखानंद मठपती बालवाडी विभागाच्या अध्यक्ष अंजलीताई नळगिरकर ,केंद्रिय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे,अंकुश मिरगुडे,प्राचार्य श्रीपाद सिमंतकर,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर, लालासाहेब गुळभिले,माधव मठवाले आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत 40 संघांचा सहभाग असून दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता मोरे यांनी केले तर आभार लालासाहेब गुळभिले यांनी मानले.प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख सचिन यतोंडे, स्वागत व परिचय स्पर्धा सहप्रमुख शरद पवार, वैयक्तिक गीत बालाजी पडलवार तर शांतिमंत्र किरण नेमट यांनी म्हटले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
0 Comments