इंडियन डेंटल असोसिएशन लातूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.विजयकुमार करपे यांची निवड
उदगीर : नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेमध्ये वर्ष 2023 - 24 या नवीन कार्यकालासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये उदगीर शहरातील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. विजयकुमार करपे यांची अध्यक्षपदी , डॉ. मुकेश अराडले लातूर यांची सचिवपदी, डॉ. शैलेश पडगिलवार लातूर यांची कोषाध्यक्षपदी तर भावी अध्यक्ष वर्ष 2024-25 साठी डॉ. उत्तम देशमाने यांची निवड झाली.
या वार्षिक सभेमध्ये लातूर आयडियाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी भाग घेतला होता. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आय.डि.ए. चे अध्यक्ष डॉ. धनराज शितोळे व पदाधिकारी आणि सर्व माजी अध्यक्षांनी डॉ. विजयकुमार करपे यांचा अध्यक्षीय पदक बहाल करून सन्मान केला.
या कार्यक्रमास सर्व माजी अध्यक्ष डॉ. श्याम सांगळे, डॉ. सोमानी मॅडम, डॉ. आंबेगावकर, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. गोविंद सोनकांबळे, डॉ. मनोज वैष्णव, डॉ. सचिन बसुदे, डॉ विष्णू भंडारी, डॉ. राहुल लटुरिया, डॉ. संजीव कुमार बिरादार, डाॅ.शैलेश वंगे आदी उपस्थित होते.
यावेळी आय.डी.ए.च्या सर्व सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या नुतन पदाधिकाऱ्यास शुभेच्छा दिल्या.
0 Comments