सामाजिक जाणिव असणारे अधिकारी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी : उपसरपंच नंदकुमार पटणे
उदगीर : शहरातील नागरिकांच्या सोईसाठी सदैव कार्यतत्पर असणारे अधिकारी म्हणून उदगीर तालुक्यात ज्यांची ओळख आहे ते
कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झाला असुन असे सामाजिक जाणिव असणारे अधिकारी क्वचित असतात असे मत गुरधाळचे उपसरपंच नंदकुमार पटणे यांनी व्यक्त केले.
ते उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना बोलत होते.
यावेळी मेंगशेट्टी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी तोंडारचे निळकंठ बिरादार, लिंगायत महासंघ, उपाध्यक्ष प्रा.महेश धोंडीहिप्परगेकर, सरपंच बालाजी पाटील , सिद्धेश्वर मोरे, उपसरपंच तथा तालुका अध्यक्ष बसव ब्रिगेड उदगीर प्रा. नंदकुमार पटणे गुरधाळकर, सुमित बेलकुंदे, जयप्रकाश नंदगावे, खोलदांडगे, मुळे ,पंकज बंडे, शेख, शिवराज चाकुरे,सोमनाथ चिद्रे, शेरे आदी उपस्थित होते.
0 Comments