GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

त्या वक्तव्याचा उदगीर शहर भाजपकडून निषेध

त्या वक्तव्याचा उदगीर शहर भाजपकडून निषेध


उडगीर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा उदगीर शहर भाजपाकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून निषेध करण्यात आला.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य छत्रपतींचा अवमान करणारे असून अजित पवार यांनी माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उदगीर शहर भाजपच्या वतीने करण्यात आली. 
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, मीनाक्षी पाटील, उत्तरा कलबुर्गे, दत्ताजी पाटील, धर्मपाल नादरगे, अमोल निडवदे, पृथ्वीराज शिवशिवे,  दिलीप मजगे, सुनील सावळे, संजय पाटील, सावन पस्तापुरे,  रामेश्वर पवार, आनंद साबणे, आनंद बुंदे, गणेश गायकवाड, आमीर शेख,पप्पू गायकवाड, व्यंकट काकरे, सरोजा वारकरे, उषा रोडगे, मंदाकिनी जीवने, मधुमती कनशेट्टे, श्यामला कारामुंगे, रंजिता सांडवे, स्वाती वट्टमवार, यशवंत बारस्कर, सुनील गुडमेवार, मंगेश येरकुंडे, रविंद्र बेद्रे, संतोष बडगे, अमर सूर्यवंशी आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments