GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

येत्या काळात उदगीर शहरात 'उदगीर फेस्टीव्हल' घेणार : माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे

येत्या काळात उदगीर शहरात 'उदगीर फेस्टीव्हल' घेणार : माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे

राधासाई दांडिया महोत्सवाचे उद्धाटन

उदगीर : उदगीर शहर सुसंस्कृत शहर म्हणून नावारूपाला येत असून मला या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपली सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे आज आपण उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असून यामध्ये मागील काळात साहित्य संमेलन घेतले या साहित्य संमेलनात मनोरंजनासाठी चला हवा येऊ द्या चा हास्यकल्लोळसह, जगविख्यात गायक अजय - अतुल व अवधुत गुप्ते यांचा संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन आपण केले.
यापुढील काळात आपण उदगीर शहरात 'उदगीर फेस्टीव्हल' घेणार असल्याचे माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
ते राधासाई दांडिया महोत्सवाच्या उद्धाटनप्रसंगी उद्धाटक म्हणून बोलत होते.
यावेळी उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरल्लापल्ले, दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सौ.दिपाली औटे, अभिजीत औटे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवतीच्या शहराध्यक्ष ज्योती स्वामी, चंद्रकला बिरादार, माजी सरपंच सतीश पाटील, आदी उपस्थित होते.

शहरातील विविध ठिकाणी आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते आई जगदंबेची आरती करण्यात आली. यामध्ये हेर ता.उदगीर येथील जय भवानी नवरात्र महोत्सव,
उदयगिरी जय भवानी नवरात्र महोत्सव, चौबारा रोड उदगीर यासह विविध ठिकाणी आरती करण्यात आली.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी राधासाई दांडिया महोत्सवाच्या आयोजकांचे कौतुक करून नवरात्र महोत्सवानिमित्त जमलेल्या सर्व माता भगिनींना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. मागील दोन वर्षात कोरोनाचे संकट असल्यामुळे आपल्याला कुठलाही सण उत्साहात साजरा करता आला नाही. त्यामुळेच यावर्षी आपण नवरात्रीचा महोत्सव उत्साहात साजरा करत आहोत. पुढील काळात आपण 'दिवाळी पहाट' चा कार्यक्रम  घेणार असुन यामुळे आपल्या संस्कृतीचे महत्व पुढच्या पिढीला कळेल. या नवरात्रीच्या उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली असुन आपणास आता रात्री १२ वाजेपर्यंत दांडीया चालु ठेवण्यास परवानगी मिळेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल कोळी यांनी केले.
या दांडिया महोत्सवात शहरातील महिलांची मोठी गर्दी होती.

Post a Comment

0 Comments