सहशिक्षक ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार
बोळेगाव बु. : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांची बदली झाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. शाळेत सोशल डिस्टन्स पाळुन व शासनाच्या नियमांचे पालन करुन येथे मोठ्या उत्साहात ज्ञानेश्वर यांची बदली झाल्यामुळे दि. 26/2/2021रोजी शाळेच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माधवराव पारशेटटे , प्रमुख पाहुणे निरोपमुर्ती ज्ञानेश्वर बडगे तसेच शाळेतील शिक्षक चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठठेवाड व श्रीमती आशा मुळे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत बडगे यांचा मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे व मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ भर पेहराव व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
निरोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माधवराव पारशेटटे यांनी ज्ञानेश्वर बडगे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या तदनंतर निरोप मुर्ती श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी निरोप प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शाळेत गेल्या 2 वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य, शाळेची शैक्षणिक प्रगती, राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शाळेला व वैयक्तिक मिळालेल्या सन्मान, पुरस्कार या विषयी मनोगत व्यक्त केले. माझ्या स्वपनातील अतिशय सुंदर शाळा पहायला मिळाली. ही शाळा उपक्रमशील करण्यासाठी शाळेतील शिक्षक, पालक व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. हि शाळा माझ्या आठवणीत आयुष्यभर राहील असे मनोमन व्यक्त केले.
या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक सुभाष नरवडे व आभार शाळेतील शिक्षक सुदर्शन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
0 Comments