मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा मोतीबिंदू तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर
उदगीर : अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूरचे सचिव बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि.०५/डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९.३० ते दुपारी ०२.३० या दरम्यान श्री महादेव मंदिर देवस्थान-सभागृह, शिरूर ताजबंद, अहमदपूर येथे मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि तसेच नि:शुल्क रक्त शर्करा(ब्लड शुगर)तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदरील शिबिरामध्ये वातविकार,आम्लपित्त,मधुमेह,मुळव्याध,त्वचाविकार,लठ्ठपणा,हर्निया,हायड्रोसिल,नेत्ररोग,दंतरोग,श्वसनविकार,पोटाचे विकार,लहान बालकांचे आजार,श्वेतप्रदर,रक्तप्रदर व स्त्रीयांचे विकार-मासिकपाळी समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.
लाॅयन्स नेत्र रुग्णालय,उदगीर च्या सहकार्याने डॉ.प्रमोद जमादार,डॉ.निकिता भोसले व डॉ.सुदाम बिरादार हे रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून आवश्यकतेनुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.राजेंद्र धाटे,डॉ.उषा काळे,डॉ.पुष्पा गवळे,डॉ.रविकांत पाटील,डॉ.अमोल पटणे,डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.योगेश सुरनर,डॉ.अस्मिता भद्रे,डॉ.रश्मी चिद्रे,डॉ.प्राजक्ता जगताप,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.दीपिका भद्रे,डॉ.नम्रता कोरे,डॉ.शिवकांता चेटलूरे,डॉ.शिवकुमार होटूलकर,डॉ.शिवकुमार मरतुळे,डॉ.अमोल पाटील,डॉ.विष्णुकांत मुंढे,डॉ.प्राजक्ता कुलकर्णी,डॉ.ओम चिट्टे आणि तसेच धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज,उदगीरचे शिक्षक व शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.
0 Comments