GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी ९ कोटी ८१ लाख रू निधी मंजूर!

लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी ९ कोटी ८१ लाख रू निधी मंजूर!

जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांची माहिती
लातूर-    लातूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना निधी देण्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात लातूर जिल्हा परिषदेने पहिला नंबर मिळवला असून जिल्ह्यातील 8997 दिव्यांग लाभार्थी यांना साहित्याचे वाटप होणार आहे. 
          मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना साहित्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्याभरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास 12 हजार दिव्यांग लोकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 8997 लाभार्थी या साहित्याच्या लाभास पात्र ठरले असून या साहित्यासाठी लातूर जिल्हा परिषदेने 48 लक्ष रुपये केंद्राकडे आपले दायित्व या नात्याने केंद्राला निधी वर्ग केला. आणि केंद्राने नऊ कोटी 81 लाख रुपयांचे दिव्यांगासाठीचे विविध साहित्यासाठी मंजूर केले. या मंजुरीसाठी लातूर जिल्ह्याचे सुपुत्र मा. पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व लातूर जिल्ह्याचे खासदार मा. सुधाकर श्रुंगारे यांनी केंद्रीय मंत्री श्री. थावरचंद गेहलोत यांच्याकडे पाठपुरावा केला. 
         या साहित्याचे वाटप 10 डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा.ना.श्री थावरचंदजी गेहलोत यांच्या उपस्थितीत वर्च्युअल सभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे खरे तर या समारंभात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू शकणार नाहीत. लातूर जिल्हा परिषदेने संवेदना ॲपच्या माध्यमातून या सर्व दिव्यांगांसाठीची नोंदणी करण्यासाठी चा डाटा जमा केला होता त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने जिल्हाभरातील दिव्यांगांना न्याय मिळणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी ची पूर्वतयारी म्हणून आज दि. 7 रोजी लातूर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.राहुल केंद्रे,लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,समाज कल्याण सभापती श्री रोहिदास वाघमारे,संवेदना अँप चे निर्माते सुरेश दादा पाटील,समाज कल्याण अधिकारी श्री.खमितकर यांच्यासह जिल्हाभरातील तहसीलदार,बीडीओ,सर्व विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments