GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माउंट लिटरा झी स्कूल (सीबीएसई) मादलापुर, उदगीर शाळेची महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त उदगीर शहर पोलीस स्टेशनला भेट

माउंट लिटरा झी स्कूल (सीबीएसई) मादलापुर, उदगीर शाळेची महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त उदगीर शहर पोलीस स्टेशनला भेट

उदगीर : दि. २ ते ७ जानेवारी हा सप्ताह महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात येतो, त्या अनुषंगाने ज्ञानदीप उदयगिरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेअंतर्गत सी.बी. एस.सी बोर्डाशी संलग्नित असलेली माउंट लिटरा झी स्कूल (सीबीएसई) मादलापुर, उदगीर शाळेची महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसा प्रित्यर्थ उदगीर शहर पोलीस स्टेशनला भेट  देण्यात आली.
यावेळी गजानन काळे (पोलीस उपनिरीक्षक) व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पोलीस विभागात कसे कार्य चालते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
 तक्रार कशी नोंदवली जाते , सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक युगात गुन्हा कसा नोंदवला जातो , आरोपी गुन्हेगारास कैदीत कसे व  कोठे ठेवले जातात, गुन्ह्याचा तपास कसा केला जातो , बिनतारी संदेश यंत्रणा कशी कार्य करते व प्रासंगिक वेळेस कुठल्या शस्त्राचा वापर पोलिसांना करावा लागतो व ती कोणती कोणती शस्त्र कशासाठी वापर करतात याचे संपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या संपूर्ण पोलीस विभागाची माहिती दिल्यानंतर प्रश्नमंजुषा घेण्यात आली व अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांस बक्षीस स्वरूपात पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले व प्रसंगी उपस्थित असलेले गजानन काळे (पोलीस उपनिरीक्षक) व पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
इयत्ता सातवी ते नववी पर्यंतच्या एकूण दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थ्यांसमवेत कल्पना चौधरी (प्रभारी मुख्याध्यापक) व शिक्षक आदर्श गुप्ता, अब्दुल बशीर, अजय गायकवाड,  वीरसागर काळे (क्रीडा शिक्षक) तसेच अतुल करखेलीकर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments