स्त्रीरोग डाॅक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे तर सचिवपदी डॉ.प्राजक्ता गुरूडे
उदगीर : स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.सविता पदातुरे यांची तर सचिवपदी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्राजक्ता गुट्टे - गुरूडे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी उदयगिरी लाॅयन्स येथे पार पडला. उदगीर स्त्रीरोग संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्ताने आरोग्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस भारतीय स्त्री संघटना, भारतीय स्त्री लाॅप्रोस्कोपिक संघटना आणि मुंबई स्त्रीरोग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष डाॅ.सविता पदातुरे सचिव डॉ. प्राजक्ता गुरूडे पदाधिकारी यांना स्त्रीरोग संघटनेचे सेक्शुल महाराष्ट्र कमिटीचे चेअरमन डॉ.मदन कांबळे, फॅमिली वेल्फेअर कमिटीचे चेअरमन डाॅ.रचना जाजू यांनी पदग्रहण सोहळ्याची शपथ दिली. यावेळी आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पाटील, आ.ए.पी.चे अध्यक्ष डॉ.जयंत वायगावकर, ए.म.सी.चे अध्यक्ष डॉ.संतोष पांचाळ उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्षपदी डॉ.आरती वाडीकर, कोषाध्यक्षपदी डॉ.शैलेश येरोळकर, सहसचिव पदी डॉ.आत्तार मॅडम, डाॅ. राजेश राठोड यांचीही नूतन पदग्रहण समारंभात सत्कार करण्यात आला. डॉ.स्वाती पाटील गतवर्षीच्या अध्यक्षा आणि सचिव डाॅ.प्रवीण मुंदडा यांनी मागील वर्षांच्या पदावर कारभार केलाचे काम व कार्य अहवाल नुतन अध्यक्षा, सचिव यांच्याकडे हस्तांतरित केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नूतन सचिव व माहेर मॅटनिटी टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटलच्या संचालिका, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्राजक्ता गुरुडे यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
0 Comments