शहरातील विविध विकास कामांची माजी बांधकाम राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन पाहणी
प्रशासकीय इमारतीसह चालु असलेले विविध इमारतीची कामे वेळेत व दर्जेदार करण्याचे निर्देश
उदगीर : शहारातील प्रशासकीय इमारतीसह चालु असलेल्या बांधकामाची पाहणी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी काल अधिकाऱ्यांसोबत जावून केली. यावेळी कामाची गुणवत्ता, कामाचा दर्जा इमारतीसाठी लागणारे साहित्य आदींची पाहणी करुन संबंधित ठेकेदारांना कडक सुचना केल्या.
मतदार संघात नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय कार्यालयाची इमारत, तहसील कार्यालयाची इमारत, पंचायत समितीची इमारत, पशुवैद्यकीयचे शासकीय विश्रामगृह, तळवेस येथील बौद्ध विहार , बिदर रोडवरील लिंगायत भवन, शासकीय डि.एड् काॅलेज परिसरातील मुस्लिम शादीखान्याची इमारत, मलकापुर भागातील बांधकाम विभाग वर्ग २ चे कार्यालय आदी इमारतींची पाहणी करण्यात आली.
यावेळी बोलताना आ.संजय बनसोडे यांनी मतदार संघातील जळकोट व उदगीर येथे नव्याने विविध इमारती आपण मंजूर केल्या होत्या आता त्याचे बांधकाम चालु आहे. येत्या मार्च - एप्रिल पर्यंत ज्या इमारतीचे काम पूर्ण होईल त्या इमारतीत संबंधित कार्यालय स्थांलतरीत होवुन लवकरच ते नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देवु अशी आशा व्यक्त करुन चालु असलेली कामे प्रगतीपथावर असुन त्या कामांना आणखी गती देवून ती वेळेत व दर्जेदार करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना आ.संजय बनसोडे यांनी केल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेडचे मुख्य अभियंता बी.एस. पांढरे, सार्वजनिक बांधकाम मंडळ
लातूरचे अधिक्षक अभियंता सलीम शेख, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, शाखा अभियंता अनिल कांबळे, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी मुळे, दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, जळकोटचे माजी जि.प. सदस्य संतोष तिडके, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,सर्जेराव भांगे, देविदास कांबळे, शशिकांत बनसोडे, व्यंकट बोईनवाड, सतिश वाघमारे, शिवमुर्ती उमरेगकर, नामदेव भाटकुळे, अनिल सोमवंशी, अविनाश गायकवाड, आदी उपस्थित होते.
0 Comments