GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातुन सीआरएफ फंडातुन केंद्रीय मार्गासाठी ३३ कोटी रुपयाचा निधी मंजूर

आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातुन सीआरएफ फंडातुन केंद्रीय मार्गासाठी ३३ कोटी रुपयाचा निधी मंजूर

केंद्रीय रस्तेवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे आ.बनसोडे यांनी मानले आभार



उदगीर : शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या शहरात बाहेरगावाहुन नागरिकांची व शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने उदगीर शहरात मोठी वर्दळ असते. शहराला ऐतिहासिक वारसा आहे म्हणून उदगीर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करुन महाराष्ट्रात आपल्या मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातुन 
मतदार संघाला जोडणारे सर्व रस्ते पूर्ण झाले आहेत.
उदगीर शहराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ उदगीर शहरहद्द ते कौळखेड मार्गे कर्नाटक बाॅर्डर जवळपास साडेचौदा कि.मी. पर्यंतच्या रस्त्यासाठी केंद्रशासनाकडुन सीआरएफ फंडातुन १८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर जळकोट तालुक्यातील केकतसिंदगी ते कंधार या १० कि.मी.च्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये असे एकुण ३३ कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असुन त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे.
उदगीर मतदार संघाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी केंद्रशासनाकडुन निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा आ.संजय बनसोडे यांनी केंद्रीय रस्तेवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे दिल्ली येथे जावून अनेकवेळा केली होती. त्यातच उदगीर शहरहद्द ते कौळखेड मार्गे कर्नाटक बाॅर्डर हा जवळपास साडेचौदा कि.मी.चा तर जळकोट तालुक्यातील केकतसिंदगी ते कंधार या १० कि.मी.च्या जिल्हा मार्गासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा म्हणुन सतत पाठपुरावा केला होता. सदर मागणी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली असुन सदर रस्त्यांना मंजुरी देण्यात आली असल्याने आमदार संजय बनसोडे यांनी ना.गडकरी यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments