एस.टी. महामंडळाची बस म्हणजे गोरगरीबांची जीवनवाहिनी : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर : मागील २ वर्षाच्या कोरोनाकाळात एस.टी. महामंडळ डबघाईला आले होते. कोरोना काळात सर्वच बसगाड्या ह्या एकाच ठिकाणी थांबुन असल्याने बहुतांश बस गाड्या ह्या बिघाडल्या होत्या त्यामुळे आपण
प्रवाशांच्या सोयीकरीता नविन १०० बस गाड्या उदगीर आगाराला द्याव्यात अशी मागणी एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांना भेटुन केली होती. कारण लातुरच्या नंतर उदगीरचे आगार मोठे असल्याने या भागातील प्रवाशांची गैरसोय होत होती हे लक्षात घेवुन आपण ज्यादा नविन बस गाड्यांची मागणी केली होती कारण महामंडळाची बस म्हणजे गोरगरीबांची जीवनवाहिनी असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर आगारातील नव्याने आलेल्या बसगाड्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी एस.टी. महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, वाहतूक निरीक्षक अनिल पळनाटे, संदीप देशमुख, दयानंद शिंदे, शिवमुर्ती उमरगेकर, सतिश वाघमारे, निवृत्ती भाटकुळे, रवी कांबळे, रमेश माने, मनोज बनशेळकीकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, कोरोना महामारीच्या संकटामुळे एस.टी. आगाराच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक हानी झाली अत्यंत बिकट परिस्थितीमध्येही मी मंत्री असताना आमच्या सरकारने १००० कोटी महामंडळाला दिले. यावेळी माझ्या मतदार संघातील बसस्थानकाची अतिशय दुरावस्था झाल्याने मी स्वतः पाठपुरावा करुन ५ कोटी रुपये मंजूर केले. त्याचे काम लवकरच सुरु होणार असुन अत्यंत दर्जेदार व आत्याधुनिक बसस्थानकाची निमिर्ती लवकरच करण्यात येणार आहे.
आपल्याकडे डाॅक्टर आणि बस चालकाला ईश्वराचे रुप मानले जाते कारण बस चालकाच्या जीववरच आपण बसमध्ये सुखरूप प्रवास करत असतो. त्यामुळे तर बसचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास म्हणुन आपले पूर्वज सांगत होते. महामंडळची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे
ही बिकट परिस्थिती महामंडळवर आली आहे.
आता नव्या बसगाड्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मागील काळात आपण ६० बसेसची मागणी होती त्यावेळी ३० बस उपलब्ध झाल्या असुन त्यापैकी पहिल्या टप्पातील १३ बसचे आज आपण लोकार्पण करत आहोत. एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी सदर बस गाड्या उपलब्ध करुन दिल्या असल्याने त्यांचेही आभार आ.बनसोडे यांनी मानले. व
उर्वरित बस गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाहतूक निरीक्षक अनिल पळनाटे यांनी केले तर आभार केरबा सांगवीकर यांनी मानले. यावेळी एस.टी. आगारातील कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments