सर्वासामान्य नागरिकांना मूलभूत गरजा व शासनाच्या योजना पुरविणे हे लोकप्रतिनिधीचे काम : माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे
हंडरगुळी बाजारातील रस्त्यासाठी १५ लक्ष रुपयाचा निधी
उदगीर : सर्वसामान्य नागरिकांची सेवा करणे व त्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेवुन काम करणे, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे हे कुठल्याही लोकप्रतिनिधीचे काम असून आपल्या हंडरगुळी गावात त्या योजना पोहचविण्याचे काम ग्राम पंचायतीच्या माध्यामातून होत आहे. या पुढील काळात आपल्या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही
सर्वासामान्य नागरिकांना मूलभूत गरजा पुरविणे हे लोकप्रतिनिधीचे काम असल्याचे मत उदगीर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळया प्रसंगी उद्धाटक म्हणून बोलत होते.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी उपलब्ध करुन दिलेल्या १ लाईटची डिपी २२ पोल, दलित वस्तीची योजना, अंगणवाडी, जन सुविधा, १५ वा वित्त आयोग, सार्वजनिक शौचालय , आमदार फंड व विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आ. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी सभापती कल्याण पाटील, हंडरगुळीचे सरपंच संजय आंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले पाटील,प्रा. श्याम डावळे, वाढवणा पोलीस ठाण्याचे सहय्याक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, वाढवणाचे सरपंच
नागेश थोंटे, वाढवणा खु. सरपंच पिंटु मुसणे, विजयकुमार चवळे, चिमाचीवाडीचे सरपंच नाथराव बंडे, ज्ञानेश्वर गायकवाड, हाळीचे उपसरपंच राजु पाटील, मोर्तळवाडीचे उपसरपंच प्रभाकर पाटील, पं.स. सदस्य माधव कांबळे, रूद्रवाडीचे उपसरपंच बापूराव जाधव, सिध्दार्थ मसुरे, खाजा तांबोळी, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
हाळी - हंडरगुळी ही गावे उदगीर तालुक्यातील मोठी गावे असुन येथे जनावरांचा बाजार हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना व या बाजारात येणाऱ्या मुक्या जनावरांना रस्त्याची अडचण होत असल्याने आमदार फंडातुन या रस्त्यासाठी १५ लक्ष रुपयाचा निधी देण्याचे जाहीर केले.
यावेळी मातंग समाज व मुस्लिम समाजातील तरुणांनी शाल, पुष्पहार देवून आ.बनसोडे यांचा सत्कार केला. या कार्यक्रम हाळी - हंडरगुळी, वाढवणा व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments