अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांना श्रध्दांजली वाहून आ.संजय बनसोडे यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन
उदगीर : तुळजापूर येथून देवीचे दर्शन घेवुन उदगीरकडे परत येत असताना परवा लोहारा गावाजवळ बस आणि कारचा अपघात झाला यात ५ तरुणांचा जागीच मृत्यु झाला. त्यापैकी उदगीर तालुक्यातील भाकसखेडा पश्चिम येथील अलोक तानाजी खेडकर व उदगीर शहरातील नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार या दोन तरूणांचा या अपघातात समावेश होता.
काल या दोन्ही युवकांच्या घरी जावून उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी श्रध्दांजली अर्पण करुन. त्यांच्या कुंटुबियाची भेट घेवुन धीर दिला व मी सदैव आपल्या सोबत असल्याचे सांगितले.
झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असुन ही घटना आपणास कळाल्यानंतर आपण ताबडतोब बैंगलोर येथुन निघून थेट लातूर येथे शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी तरुणी प्रियंका बनसोडे हिची विचारपूस केली असे सांगून मी आपल्या सोबत आहे असे सांगितले.
यावेळी आ.संजय बनसोडे यांच्यासोबत भाकसखेडच्या सरपंच अर्चना खेडकर,
उपसरपंच अरविंद मोरे, मंडळ अधिकारी पंडित जाधव, चेअरमन विवेक जाधव,रा.काॅ.चे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार चवळे, तर उदगीर येथे शहराध्यक्ष समीर शेख, प्रा.श्याम डावळे, प्रवीण भोळे, आदी उपस्थित होते.
0 Comments