GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगिरात आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते रावण दहन

उदगिरात आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते रावण दहन 

उदगीर : मागील दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्याने उदगीर शहरातील रावण  दहनाचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता मात्र  दोन वर्षानंतर रावण दहनाचा कार्यक्रम परंपरेनुसार येथील महोत्सव समितीच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर 
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावण दहनाच्या आधी अर्धातास फटाक्यांची अतिषबाजी करुन त्यानंतर उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.संजय बनसोडे यांनी
मतदार संघातील नागरिकांना चांगल आरोग्य , सुख, समृध्दी लाभावी अशी देवीच्या चरणी प्रार्थना करुन उपस्थित नागरिकांना दसरा व दिवाळी शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,
उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, ज्येष्ठ विधीज्ञ गुलाबराव पटवारी, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, कुणाल बागबंदे, धनाजी बनसोडे, आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील विविध भागातुन देवीची पालखी आली होती. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी करत दसरा महोत्सवाचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments